वडगावच्या प्रभागरचनेत
कोणताही बदल नाही

वडगावच्या प्रभागरचनेत कोणताही बदल नाही

Published on

वडगाव मावळ, ता. १८ : वडगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नागरिकांच्या माहितीसाठी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भौगोलिक रचनेत कोणताही बदल झाला नसल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रशासक तसेच मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार विभागीय आयुक्तांनी प्रारूप प्रभागरचनेला मान्यता दिली आहे. वडगाव नगरपंचायतीची स्थापना ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये झाल्यानंतर जुलै २०१८ मध्ये पहिली निवडणूक झाली होती. तेव्हाप्रमाणेच या निवडणुकीसाठी प्रभागरचना आहे. १७ प्रभागांतून तेवढेच सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. २०११ च्या जनगणने प्रमाणे लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभागरचना तयार करण्यात आली.
ही प्रभाग रचना प्रभागांचे नकाशे, चतुर्सिमा आदी तपशिलासह नगरपंचायतीच्या नोटीस बोर्डवर तसेच नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना २१ ऑगस्टपर्यंत कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये लेखी स्वरूपात हरकती-सूचना सादर करता येतील.
प्रभागरचना अशी ः
क्रमांक ः लोकसंख्या ः अनुसूचित जाती ः अनुसूचित जमाती ः (कंसात व्याप्ती)
१ : ८९० ः ८५ ः १२२ ः (महालक्ष्मी मंदिर, केशवनगर)
२ : ८०१ ः ५१ ः १६ ः (केशवनगर जि. प.शाळा, कातवी जि. प. शाळा, भैरवनाथ मंदिर)
३ : ८७८ ः ५३ ः ५९ ः (मधुबन अंगणवाडी, पीरबाबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर)
४ : ९३६ -ः ३२ ः १० ः (गणपती मंदिर, घुमट बोळ)
५ : ९७२ ः १०१ ः ३२ ः (माजी आमदार रूपलेखा ढोरे यांचे निवासस्थान)
६ : ८२१ ः ८९ ः - (खंडोबा मंदिर, रमेशकुमार साहनी स्कूल)
७ : ९२२ ः २८८ ः ३४ (मिलिंदनगर समाज मंदिर, मातोश्री हॉस्पिटल)
८ : ८२६ ः ३२ ः २४ ः (कानिफनाथ मंदिर, विविध कार्यकारी सोसायटी गोडाऊन)
९ : ९६८ ः ४२ ः ४१ (तलाठी कार्यालय, चिंचेचा गणपती मंदिर, व्ही. बर्ड स्कूल)
१० : ८८८ ः १७ ः २५ (दत्त मंदिर, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, श्रीमंत महादजी शिंदे स्मारक)
११ : ९२७ ः ४७ ः २५ ः (श्री पोटोबा मंदिर, कोर्ट, जि. प. शाळा)
१२ : ८६० ः ६० ः ६१ ः (माळीनगर अंगणवाडी, शिंदे टेकडी पाण्याची टाकी)
१३ : ८३५ ः ६७ ः २७ ः (वरदायिनी माता मंदिर)
१४ : ८४५ ः १६५ ः १० ः (भेगडे लॉन्स, विठ्ठल रुक्मिणी मंदिर)
१५ : ९८३ ः ६७ ः ४६ ः (न्यू इंग्लिश स्कूल, ठाकरवस्ती जि. प.शाळा)
१६ : ८१५ ः ९९ ः १२ ः (ज्योतिबा मंदिर, डेक्कन वेअर हाऊस)
१७ : ९७४ ः १३२ ः ६१ ः (पोदार स्कूल, मोरया अंगणवाडी, उमराळ देवी मंदिर)
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com