वडगावात वाढले सुमारे पाच हजार मतदार
वडगाव मावळ, ता. ३ : नगर पंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यानुसार एकूण मतदारसंख्या १९ हजार ८४७ इतकी झाली आहे. प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक २ हजार २१, तर प्रभाग १४ मध्ये सर्वांत कमी ७३० मतदार आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदार संख्येत सुमारे ५ हजार १११ने वाढ झाल्याचे यादीतून समोर आले आहे.
मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी शनिवारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली. ती नागरिकांच्या माहितीसाठी नगर पंचायत कार्यालय व नगर पंचायतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
वडगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर फेब्रुवारी २०१८ मध्ये नगर पंचायतीत झाले. यानंतर जुलै २०१८ मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली होती. त्यावेळी शहराची एकूण मतदारसंख्या १४ हजार ७३६ इतकी होती. आता शहराची मतदारसंख्या १९ हजार ८४७ झाली आहे. त्यात १० हजार १८४ पुरुष व ९ हजार ६६३ महिला मतदारांचा समावेश आहे. ही निवडणूक एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना सुमारे वीस हजार मतदारांपर्यंत पोचावे लागणार आहे.
प्रभागनिहाय मतदार संख्या
प्रभाग - पुरुष - महिला - एकूण
१ : ६५९ ६४४ - १,३०३
२ : ६६६ - ६७८ - १,३४४
३ : ५७३ - ५४५ - १,११८
४ : ४४६ - ४३८ - ८८४
५ : ५८३ - ५६७ - १,१५०
६ : ६२१ - ५८८ - १,२०९
७ : ७४६ - ६७० -१,४१६
८ : ४६२ - ४०४ - ८६६
९ : ५३९ - ५६७ - १,१०६
१० : ५०८ - ४६१ -९६९
११ : ५५२ - ५३३ - १,०८५
१२ : ३६८ - ३७५ - ७४३
१३ : ६७१- ६२१ - १,२९२
१४ : ३४९ - ३८१- ७३०
१५ : ७०९ - ६१५ - १,३२४
१६ : ६७६ - ६११ - १,२८७
१७ : १,०५६ - ९६५ - २,०२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

