वडगावमध्ये १४ एप्रिलला सामुदायिक विवाह सोहळा
वडगाव मावळ, ता. ११ : येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी १४ एप्रिल रोजी संपन्न करण्याचे निश्चित करण्यात आले असून, सामुदायिक विवाह सोहळा समिती २०२६च्या अध्यक्षपदी अनिल कोद्रे, कार्याध्यक्षपदी खंडुजी काकडे व कार्यक्रम प्रमुखपदी संभाजी येळवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. समितीचे मावळते अध्यक्ष अजय धडवले, ज्येष्ठ संचालक अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, सुनील शिंदे, अरुण वाघमारे, विलास दंडेल, विवेक गुरव, सदाशिव गाडे, गणेश विनोदे, शंकर ढोरे, महेश तुमकर, बाळासाहेब तुमकर, अनिकेत भगत, सुहास विनोदे उपस्थित होते. बैठकीत सामुदायिक विवाह सोहळा समितीची नूतन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा १४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार असून, यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच, जोडप्यांना संसारपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. १ एप्रिल पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, आत्तापर्यंत सुमारे २०० जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा नावीन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून, यात मावळ तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील वधू-वरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पंढरीनाथ ढोरे व अनिल कोद्रे यांनी केले आहे.
प्रतिष्ठानची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष- अनिल कोद्रे, कार्याध्यक्ष- खंडुजी काकडे, कार्यक्रम प्रमुख- संभाजी येळवंडे, उपाध्यक्ष- सुधीर ढोरे, सचिव- कार्तिक यादव, विनायक लवंगारे, खजिनदार- अक्षय बेल्हेकर, सहखजिनदार- गणेश झरेकर, प्रसिद्धीप्रमुख- केदार बवरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

