

वडगाव मावळ, ता.१४ : राजे शिव छत्रपती जयंती महोत्सव-२०२६ समितीच्या अध्यक्षपदी कुलदीप ढोरे यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे यांची निवड करण्यात आली आहे.
समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या वर्षीची कार्यकारणी निवडण्यात आली. मावळते अध्यक्ष अतिश ढोरे, शहर भाजप अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, नगरसेवक अनंता कुडे, संदीप म्हाळसकर, भूषण मुथा, कल्पेश भोंडवे, गणेश तांबे, अतुल म्हाळसकर, अमोल ठोंबरे, विकी म्हाळसकर, संतोष भालेराव, प्रवीण पाटोळे, युवराज म्हाळसकर आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे हे ४७ वे वर्ष असून तिथीप्रमाणे शिवजयंतीचे आयोजन ३ ते ६ मार्च दरम्यान होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला , युवक व लहान मुलांसाठी विविध उपक्रम तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष कुलदीप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.