शिवसंस्कारांनी घडेल आदर्श जीवन

शिवसंस्कारांनी घडेल आदर्श जीवन

Published on

वडगाव मावळ, ता. १५ ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे व संस्कारांचे आचरण केल्यास जीवन आदर्शवत होईल,’’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केले.
येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री रमेशकुमार साहनी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव राजेंद्र वहिले, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष राजेंद्र झोरे, मुख्याध्यापिका मीना अय्यर, व्यवस्थापक आदिनाथ आगळमे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्याख्याते प्रमोद बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून आजच्या पिढीने काय घ्यावे, या विषयावर व्याख्यान दिले. सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आदर्श कसे निर्माण करू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले. मावळ तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com