वडगावातील सीसीटीव्ही कॅमेरे 
सुरू करण्याची मागणी

वडगावातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी

Published on

वडगाव मावळ, ता. १७ : वडगाव शहरातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी मुख्य रस्त्यावरील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी वडगाव नगरपंचायतीकडे केली आहे. नगरसेवक विशाल वहिले व अनंता कुडे यांनी याबाबत नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांत मुख्य रस्त्यावर चोरीचे अनेक प्रकार घडले आहेत. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचा तपास लागलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर कदाचित या चोरांचा सुगावा लागला असता. वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी तातडीने आपल्या कार्यालयाच्या देखरेखीत असणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर चालू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com