पिंपरी-चिंचवड
‘ज्येष्ठ नागरिक संघाला अद्ययावत कार्यालय मिळावे’ अद्ययावत कार्यालय मिळावे’
वडगाव मावळ, ता. २१ : वडगाव नगरपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाला अद्ययावत कार्यालय मिळावे, अशी मागणी वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष रामदास म्हाळसकर, देविदास शिदोरे, राजाराम म्हाळसकर, चंद्रकांत ठोंबरे, झुंबरलाल कर्नावट, सोमनाथ काळे, अर्जुन ढोरे, प्रकाश कुडे, कान्हू सावळे, लक्ष्मण भेगडे आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार शेळके यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. ज्येष्ठ नागरिक संघाचे मोठ्या प्रमाणावर सभासद असून, त्यांना बसण्यासाठी हक्काची जागा मिळावी. यासाठी नगरपंचायत कार्यालयात अद्ययावत कार्यालय मिळावे, अशी मागणी करण्यात आली. संबंधितांशी चर्चा करून कार्यालय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनाही संघटनेने निवेदन दिले आहे.

