दिल्ली येथील आंदोलनात मावळातूनही सहभाग

दिल्ली येथील आंदोलनात मावळातूनही सहभाग

Published on

वडगाव मावळ, ता. ८ : सेवानिवृत्तीधारकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘ईपीएस ९५’ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून दिल्ली येथे आंदोलन होणार आहे. यात मावळ तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. ही माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष दशरथ ढोरे, सचिव विजय राऊत यांनी दिली.
देशात ८१ लाख सेवानिवृत्तीधारक विविध मागण्यांसाठी गेली आठ वर्षे ‘ईपीएस ९५’ राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत यांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहेत. अनेकदा रस्त्यावर उतरून तालुका, जिल्हा व ईपीएफओ कार्यालयावर अनेक आंदोलने झाली आहेत. सुमारे २५ ते ३० वर्षे सेवा करून ‘ईपीएफओ’कडे जमा केलेली रक्कम असतानाही त्यांना फक्त प्रतिमहा १ हजार १७५ रुपये इतकी तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वैद्यकीय सुविधा पुरेशा मिळत नाहीत. सध्या दिल्ली येथे संसदीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

सेवावित्तीधारकांच्या मागण्या
साडेसात हजार रुपये मासिक पेन्शन व महागाई भत्ता मिळावा
पती-पत्नीसाठी वैद्यकीय सुविधा द्यावी.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हायर पेन्शनचा लाभ देण्यात यावा
वंचित राहिलेल्या पेन्शनरांना पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com