गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी : काँग्रेस
वडगाव मावळ, ता. १० : अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ केली आहे. या निर्णयाला मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. ही भाववाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी अध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले, नितीन ढोरे आदींनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ‘‘सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गॅस सिलिंडरची दरवाढ केली आहे. मात्र, या दरवाढीमुळे तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, पवनानगर, नाणे, पवन व आंदर मावळातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या उपजीवीकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

