

वडगाव मावळ, ता. ९ : रयत शिक्षण संस्थेच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील रयत अकॅडमीची स्थापना करण्यात आली असून, तिचे उद्घाटन राज्य कर सहाय्यक आयुक्त मीनल पोटे व वडगाव मावळच्या पोलिस उपनिरीक्षक माहेश्वरी पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. प्रतिक गायकवाड, रोहित फालके, सदगुरू आगळमे, सिद्धेश मोरे, श्रीकांत महामुनी, निशा लालगुडे या माजी विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवीन नवघणे आणि सदस्य आदी उपस्थित होते. प्राचार्य सतीश हाके यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.