

वडगाव मावळ, ता. १० : मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराने १६ ते १८ एप्रिल दरम्यान वडगाव येथे वसंत चैतन्य व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. आदर्शांच्या जन्मोत्सव मासानिमित्त येथील डी. एड. महाविद्यालयात व्याख्याने होतील. व्याख्यानमालेचे हे चौथे वर्ष आहे. गुरुवारी (ता. १६) दुपारी १२ वाजता आमदार सुनील शेळके व सारिका शेळके उद्घाटन करतील. पहिल्या दिवशी प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांचे व्याख्यान होईल. सभापती सुनीता येवले अध्यक्षस्थानी, तर उद्योजक अशोक बाफना प्रमुख पाहुणे असतील. शुक्रवारी (ता. १७) प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचे व्याख्यान होईल. तळेगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण भोसले अध्यक्षस्थानी, तर माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर प्रमुख पाहुणे असतील. शनिवारी (ता. १८) समाजसेवक यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान होईल. शिक्षक नेते भगवान शिंदे अध्यक्षस्थानी, तर भिकल्या धिंडा प्रमुख पाहुणे असतील. यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात येईल. रोज १५ गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला जाईल. मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक राजू भेगडे, शिवाजीराव ठाकर, अध्यक्ष बाबासाहेब औटी, उपाध्यक्ष सहदेव डोंबे, कार्याध्यक्ष तानाजी शिंदे, गोरक्ष जांभूळकर, सचिव अमोल चव्हाण, उपक्रम प्रमुख हरिश्चंद्र शिवदे, मल्हारी आडकर, कुंडलिक लोटे आदींनी संयोजन केले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.