कान्हे फाटा ते सावळा रस्त्याचे काम संथगतीने

कान्हे फाटा ते सावळा
रस्त्याचे काम संथगतीने
Published on

वडगाव मावळ, ता. २६ ः कान्हे फाटा ते सावळा रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर कोणत्याही सुरक्षाविषयक उपाययोजना केलेल्या नाहीत. शिवाय, पावसाळ्यात रस्ता अधिक धोकादायक होईल, यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वी काम करून घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, याकडे आंदर मावळ भागातील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
---

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com