

वडगाव मावळ, ता. ८ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्म वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने वडगाव येथे ‘ज्ञान माऊली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राज्यातील प्रत्येक महसूल विभागात ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्व कल्याणकारी रचनांचा जागर केला जात आहे. त्याच अनुषंगाने मावळ तालुक्यात वडगाव येथे हा कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या भक्तिमय संगीत कार्यक्रमास भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, गणेश खांडगे, भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, मनोज येवले, शांताराम कदम, संतोष भेगडे, अनंता कुडे, बाबासाहेब औटी आदींसह पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सादरीकरण जगद्गुरू भजनी मंडळ यांनी केले. संगीत, अभंग, नृत्य, नाट्य व विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे साहित्य, विचार आणि आध्यात्मिक संदेश श्रोत्यांसमोर मांडण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांनी आणि भक्तिमय सादरीकरणाने कार्यक्रमस्थळी आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी प्रास्ताविक केले. मयूर भरड यांनी सूत्रसंचालन केले. मावळ तालुका वारकरी संप्रदाय व मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीने संयोजन करण्यात आले.
वडगाव मावळ : ‘ज्ञान माऊली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना जगद्गुरू भजनी मंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.