निष्ठा, प्रेम, सातत्य राखल्यास यश हमखास ः गोखले

निष्ठा, प्रेम, सातत्य राखल्यास
यश हमखास ः गोखले
Published on: 

वडगाव मावळ, ता. १२ : ‘‘प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता असते. परंतु न्यूनगंड बाजूला करून तिची जाणीव होणे महत्त्वाचे असते. ध्येय निश्चित करून त्यावर निष्ठा, प्रेम व सातत्य राखून मार्गक्रमण केल्यास यश हमखास मिळते,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मधुराणी गोखले यांनी केले.
येथील मावळ विचार मंचाने नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अबोली ढोरे होत्या. प्रमुख पाहुण्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. रंजनाताई भोसले, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, या वर्षीचे अध्यक्ष अरुण वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
‘माझा कला प्रवास’ या विषयावर बोलताना मधुराणी गोखले म्हणाल्या, ‘मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. अभिनय क्षेत्रात जायचे हे मी दहावीत असतानाच ठरविले होते. त्यास सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता. त्या निर्णयावर ठाम राहिल्याने हळूहळू त्यांचा विरोध मावळला. आई कलाकार असल्याने कलेचा वारसा घरातूनच मिळाला. तिने माझी प्रत्येक गोष्ट जोपासली व प्रोत्साहन दिले. माझी शाळा ही माझी दुसरी तर कविता ही माझी तिसरी आई. शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले. इच्छा असेल तर मार्ग निघतो. तब्बल ८७ ऑडिशन दिल्यानंतर मला पहिली जाहिरात मिळाली. तब्बल पाच वर्षे चाललेल्या आई कुठे काय करते या मालिकेने मला ओळख दिली.
अध्यक्ष अरुण वाघमारे यांनी स्वागत केले. डॉ. रवींद्र आचार्य यांनी प्रास्ताविक केले. हर्षदा दुबे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रमुख कांचन ढमाले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com