

वडगाव मावळ, ता. १२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘जनजातीय गौरव दिन’ आणि ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १२) वडगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी पांचाळ, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष विक्रम हेमाडे, वडेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संजय निकम आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची व त्यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. शुक्रवारी (ता. १३) आदिवासी बांधवांना रसवंती गृह, शेळीपालन, किराणा दुकान, कुक्कुटपालन, पिठाची गिरणी आदी वैयक्तिक योजना व सामूहिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप होणार असून क्रांतिकारकांच्या स्मारकांची स्वच्छता मोहीम व दिपोत्सव, जनजातीय गौरव दिन, घोडेगाव येथील पृथ्वी मंगल कार्यालयात आदिवासी समाजाचा मेळावा, त्यानिमित्त रानभाजी महोत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आधार कार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी लागणारे पुरावे यांचे शिबिर, शिरूर येथे आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर, आदिवासी आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सक्षमीकरण दिन व जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा सांगता सोहळा आदी कार्यक्रम १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.