संचेती शैक्षणिक संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संचेती शैक्षणिक संकुलात 
वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न
संचेती शैक्षणिक संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

संचेती शैक्षणिक संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

sakal_logo
By

वाकड, ता. २४ : थेरगाव येथील संचेती शैक्षणिक संस्थेत तीन वर्षानंतर वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. शालेय शिक्षणासह शारीरिक शिक्षणाचीही विद्यार्थ्यांना तितकीच गरज आहे. क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थी शालेय दशेत एकोपा, बंधुता, समता अशा मूल्यांना आत्मसात करतात. त्यामुळे दरवर्षी विद्यालयामार्फत तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ऑलिंपियन खेळाडू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले.
विद्यार्थ्यांच्या खेल वृत्तीचे व शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करताना अकोटकर म्हणाले की, संचेती शैक्षणिक संकुलाकडून विद्यार्थ्यांना खेळासाठी दिले जाणारे प्रोत्साहन पाहता या शाळेतील काही विद्यार्थी भविष्यात ऑलिंपिक स्पर्धेत धडक मारू शकतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले. संस्थेच्या सचिव वर्षा टाटिया यांनी संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थी घडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.
विविध खेळातील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महापालिकेचे पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, मराठी माध्यमच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिरादार, इंग्रजी माध्यमचे प्राचार्य अभ्रा रे, क्रीडा शिक्षक श्रीधर गायकवाड, रणजित पोटे यांनी कार्यक्रमांचे व खेळांचे नियोजन केले.