Fri, March 31, 2023

मारुंजीत आज एक गाव एक शिवजयंती उत्सव
मारुंजीत आज एक गाव एक शिवजयंती उत्सव
Published on : 17 February 2023, 1:37 am
मारुंजीमध्ये उद्या
एक गाव एक शिवजयंती
हिंजवडी, ता. १७ : मारूंजी ग्रामस्थ व अखिल मारूंजीगाव शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने मारूंजी (ता. मुळशी) येथे एक गाव, एक शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे ः शनिवारी (ता. १८) मारूंजीतून पुण्याच्या दिशेने मशाल आणण्यासाठी प्रस्थान. रविवारी (ता. १९) सकाळी नऊला मारूंजीत आगमन, शिवार वस्ती ते मारूंजी गावठाण पारंपरिक पद्धतीने ढोल, लेझीम, भजन मिरवणूक, दुपारी बारा वाजता शिवप्रतिमापूजन, सायंकाळी साडे पाचला शिवव्याख्यान, सांयकाळी सातला अलार्ड कॉलेज ते गावठाणपर्यंत मिरवणूक निघेल.