मुंजोबा मंडळाकडून भाविकांना फराळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंजोबा मंडळाकडून 
भाविकांना फराळ
मुंजोबा मंडळाकडून भाविकांना फराळ

मुंजोबा मंडळाकडून भाविकांना फराळ

sakal_logo
By

वाकड, ता. २२ : मुंजोबानगर काळाखडक येथील मुंजोबा मित्र मंडळाच्यावतीने यंदाही महाशिवरात्री व शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्हीही उत्सवात तब्बल पाच हजार भाविकांना फराळाचे तर तीन हजार नागरिकांना महाप्रसाद वाटण्यात आला.
मुंजोबा शिव मंदिरात पहाटे महाभिषेक, होम-हवन झाले. त्यानंतर सायंकाळपर्यंत भजन सेवा पार पडली. वारजे येथील श्री काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू मच्छिंद्र महाराज वाळंज, क्रिष्णल सोनुगुरू तांगुदे यांच्या हस्ते महाआरती झाली. शिवजयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा पार पडला.