पोटनिवडणुकीकडे देशाचे लक्ष ः दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोटनिवडणुकीकडे 
देशाचे लक्ष ः दानवे
पोटनिवडणुकीकडे देशाचे लक्ष ः दानवे

पोटनिवडणुकीकडे देशाचे लक्ष ः दानवे

sakal_logo
By

वाकड, ता. २० : चिंचवड निवडणुकीच्या निकालावर देशातील किंवा राज्यातील राजकारणावर फरक पडणार नाही. मात्र, देशातील राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, हे स्पष्ट होणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळे ही माझी स्वतःची निवडणूक आहे; असे समजून कामाला लागा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी थेरगाव येथे सोमवारी केले.
भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, झामाबाई बारणे, सिद्धेश्वर बारणे, काळूराम बारणे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले ...
- राज्याच्या राजकारणात पाच-सहा महिन्यांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत. त्यावरही जनतेचे लक्ष
- उद्धव ठाकरे यांनी जनतेला आणि भाजपला धोका दिला आहे. ते दोन वर्षात कधीही मंत्रालयात गेले नाहीत
- आमचा फोन घेतला नाही. केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे ब्रीद वाक्य बोलून निर्धास्त राहिले
- शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कधीही निवडणुका न होता, नियुक्त्या झाल्या हे घटनाबाह्य आहे.