पुनावळ्यातील भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढवावी स्थानिक प्रतिनिधींचे आमदार-खासदारांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनावळ्यातील भुयारी मार्गाची
उंची व रुंदी वाढवावी
स्थानिक प्रतिनिधींचे आमदार-खासदारांना साकडे
पुनावळ्यातील भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढवावी स्थानिक प्रतिनिधींचे आमदार-खासदारांना साकडे

पुनावळ्यातील भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढवावी स्थानिक प्रतिनिधींचे आमदार-खासदारांना साकडे

sakal_logo
By

हिंजवडी, ता. २८ : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुनावळे येथील पुलाखाली नियमित होणारी वाहतूक कोंडी व वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढवून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी स्थानिक प्रतिनिधींनी खासदार व आमदारांकडे केली.
पुनावळे गावातील रहिवासी व माजी नगरसेविका रेखा दर्शले यांच्यासह जांबे, सांगवडे, नेरे, मारुंजी या गावातील सरपंच व गावातील ग्रामस्थांनी खासदार श्रीरंग बारणे व आमदार अश्विनी जगताप यांची भेट घेऊन, या पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांना निवेदनही दिले. यावेळी जांबेचे माजी उपसरपंच अंकुश गायकवाड, राजेंद्र माळी, सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप, मारुंजीचे माजी सरपंच आकाश बुचुडे, शिवसेना नेते विजय दर्शले, लहू गायकवाड, पर्यावरण समितीचे अध्यक्ष विलासराव गायकवाड, ओवळेचे उपसरपंच सोमनाथ इंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ
थेरगाव : पुनावळे येथील वाहतुकीची समस्या सोडवावी, या मागणीचे खासदार बारणे यांना निवेदन देताना रेखा दर्शले व विविध गावचे प्रतिनिधी.
फोटोः 03558