गॅसची मुख्य पाइपलाइन फुटली
वाकडमधील घटना ः तीनशे सोसायट्या व तीन हजार फ्लॅट धारकांना फटका

गॅसची मुख्य पाइपलाइन फुटली वाकडमधील घटना ः तीनशे सोसायट्या व तीन हजार फ्लॅट धारकांना फटका

वाकड, ता. २९ : येथील चौकात जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू असताना ‘एमएनजीएल’च्या गॅसची मुख्य लाईन फुटली. यावेळी मोठी गॅस गळती देखील झाली. तीनशे सोसायट्या व तीन हजार फ्लॅटधारकांना याचा फटका बसला.
सकाळी दहाच्या सुमारास ही लाईन फुटल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत वाकडमधील आयटी अभियंत्यांनी ट्विटरवर शेलक्या भाषेत आपला रोष व्यक्त केला. रहिवाशांना वेठीस धरणाऱ्या निष्काळजी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही लाईन तब्बल अडीच तासांनी साडे बाराच्या सुमारास दुरुस्त झाली. मात्र, तोपर्यंत अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. काहींनी त्यासाठी ट्विटरचा आधार घेतला.


‘‘ठेकेदाराला रस्त्याखालून गेलेल्या वाहिन्यांची व सर्व बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. जर त्याला माहिती नसेल तर त्याला कामे दिलीच कशी जाता? विकासकामांसाठी आजवर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे, धूळ, राडारोडा आम्ही सहन करत आहोत. आता मात्र ही समस्या हात धरून चक्क घरापर्यंत आली. मूलभूत गरज असलेली गॅस लाईन फुटल्याने सर्वत्र खोळंबा झाला अन उपासमारीची वेळ आली आहे. दोषींवर कारवाई व्हावी.
- सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन


फोटोः 03726

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com