आपल्या गुरूंविषयी सतत
कृतज्ञ असावे ः शिवले

आपल्या गुरूंविषयी सतत कृतज्ञ असावे ः शिवले

Published on

हिंजवडी, ता. १० : शाळेत शिकवणारा शिक्षकच केवळ गुरू नव्हे तर आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा, अवगुणांकडून सद् गुणांकडे नेणारा प्रत्येक जण गुरू असतो. तसेच आई-वडीलही देवाने दिलेली खूप अनमोल अशी भेट आहे, त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञता असली पाहिजे, असे मत आदर्श शिक्षक, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी नेरे-दत्तवाडी येथे व्यक्त केले.
नेरे-दत्तवाडी येथील तुळजाभवानी प्रतिष्ठानच्यावतीने गुरू पोर्णिमेनिमित्त आयोजित गुरु विषयावरील व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा. गौतम दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप जाधव, माजी आदर्श सरपंच दीपाली जाधव आणि मंडळाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.