

हिंजवडी, ता. १८ : आयटीनगरी हिंजवडीतील शाळादेखील ‘आयटी’च्या तोडीसतोड दर्जेदार शिक्षण देण्यात मागे नाहीत. हिंजवडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी सातत्याने स्पर्धा परीक्षेत चमकत आहेत. प्रखर मेहनतीच्या जोरावर शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय परीक्षा, एनएमएमएस या सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये ठसा उमटवत आहेत.
यंदाच्या आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चार विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. मारुंजी केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद हिंजवडी प्राथमिक शाळेतील सोमेश्वर संजय खरात, पल्लवी राम कलकुटगे, यश अनिल पवार, अनुष्का शैलेंद्र जाधव या चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. गेल्यावर्षी देखील हिंजवडी शाळेतील पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले होते. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शोभा कळमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : 04521
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.