सदनिकांच्या देखभालीची जबाबदारी विकासकांचीच उपनिबंधकाच्या निकालाचा गृहसंस्थांना दिलासा
वाकड, ता. १८ : विक्री न झालेल्या सदनिकांच्या देखभालीची जबाबदारी बांधकाम व्यावसायिक वा विकासकांचीच असल्याचा निकाल उपनिबंधक पुणे ३ यांनी दिला आहे. गृहनिर्माण सहकारी संस्थांना दिलासा मिळाला आहे. एका सोसायटीच्या देखभालनिधीबाबत सुरू असलेल्या प्रकरणात उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी हा निकाल दिला आहे.
पुनावळे येथील माय होम कॉपरेटिव्ह सोसायटीने के. स्टोन प्रॉपर्टीजचे संचालक मोहित गोयल यांच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी उपनिबंधक यांच्याकडे दावा दाखल केला होता. सर्व तपासाअंती उपनिबंधकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब २९ (१) अंतर्गत सोसायटीला रिकव्हरी सर्टिफिकेट जारी केले आहे. यामध्ये देखभाल शुल्क, व्याज शुल्क व कायदेशीर शुल्कासह सहा लाख २४ हजार ३१० रुपये थकबाकी बांधकाम व्यावसायिक वा वा विकसकाला विक्री न झालेल्या सदनिकांचा देखभाल निधी सोसायटीला देण्याचे निर्देश दिले आहेत.
हा निर्णय व नियम सोसायटी सभासदांना व विकसकांनाही लागू होतो. त्यांचा फ्लॅट असला तरीही ते देखभाल देय भरण्यासाठी जबाबदार असल्याचे अगदी नमूद केले आहे. विकसकाची मालकी असलेल्या किंवा ती सदनिका विकल्या न गेलेल्या फ्लॅटसाठी सोसायटीच्या उर्वरित सदस्यांप्रमाणेच कोणत्याही सवलतीशिवाय देखभालीची रक्कम त्याने भरणे आवश्यक आहे.
सोसायटी चेअरमन मधुर तनेजा यांनी सभासदांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. सचिव अतुल माळोदे म्हणाले, ‘‘सोसायटी सदस्यांवर होणाऱ्या अन्यायाला ठामपणे विरोध करणे हे व्यवस्थापन समितीचे प्रथम कर्तव्य आहे.’’
खजिनदार नीरज पाटील, सोसायटी कमिटी सदस्य गौरव देशमुख, रूपेश कोलते, वीरप्पा उल्लागड्डी, संतोष गुप्ता यांनी उपनिबंधक कार्यालयाचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

