राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ ‘अभाविप’चे आंदोलन
वाकड, ता. १८ : वाकड येथील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गृहपाल व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन केले नाही. याचा निषेध करण्यासाठी ‘अभाविप’ च्यावतीने वसतिगृहाबाहेर राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ शुक्रवारी (ता. १८) आंदोलन केले.
वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी याबाबत चौकशी केली असता, ध्वज लावण्याची आवश्यकता नाही, आपल्याकडे खांब नाही तसेच दोरी उपलब्ध नाही, अशी कारणे संबंधितांकडून देण्यात आली. गृहपाल हे स्वातंत्र्यदिनी वसतिगृह परिसरात फिरकलेसुद्धा नाहीत, असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे.
आंदोलनात ‘अभाविप’चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे, प्रांत सहमंत्री आनंद भुसनर, पिंपरी चिंचवड महानगरमंत्री सिद्धेश्वर लाड, महानगर सहमंत्री श्रेया चंदन, चिराग मोडक, सुजल वाळूंजकर आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

