आजादी का अमृत महोत्सवनिमित्त
वाकडमध्ये विविध उपक्रम

आजादी का अमृत महोत्सवनिमित्त वाकडमध्ये विविध उपक्रम

वाकड, ता. २१ : इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व साई सकल संस्थेच्या वतीने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ज्युनिअर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त गेले एक वर्ष विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वर्गामध्ये प्रदर्शन घेण्यात आले. त्यास पालकांनी, विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
आयबीएमआर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी वन ॲक्ट प्ले जनजागृतीमध्ये कचरा व्यवस्थापनात सहभाग घेतला. शेवटच्या सप्ताहात वर्ग सजावट, अँटी रॅगिंग आणि भ्रष्टाचार संदर्भातील पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, युवकांचे भ्रष्टाचार विरोधातील स्थान या विषयावर आठवडाभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली.
या वेळी पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, विश्वस्त डॉ. मधुरा जोशी यांनी माणुसकीचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मूल्ये जपण्यास सांगितले. साई सकलचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दळवी, सचिव प्रसाद जोशी, आरती दळवी, डॉ.बाळासाहेब शिवले, डॉ. महेश देशपांडे, डॉ. भाग्यश्री दुधाडे, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. महेंद्र सोनवणे, प्रा. अशोक कुंभार, डॉ. ओंकार गद्रे, अभिजित नलगे आदी उपस्थित होते. प्रा. श्रुती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com