थेरगावची प्रणिता ‘ऑल इंडिया गार्ड ऑफ ऑनर’

थेरगावची प्रणिता ‘ऑल इंडिया गार्ड ऑफ ऑनर’

Published on

वाकड, ता. २४ : राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर उद्या शुक्रवारी (ता.२६) प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनासाठी कैलासनगर, थेरगाव येथील रहिवासी प्रणिता संतोष मोरे हिची ‘ऑल इंडिया गार्ड ऑफ ऑनर’ म्हणून निवड झाली आहे. प्रणिता ही पुण्यातील गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेजच्या एमईएस राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) छात्रा आहे.
‘एनसीसी’मध्ये ‘सिनिअर अंडर ऑफिसर’ म्हणून काम करत असताना प्रणिता मोरे ही दोन महाराष्ट्रीयन बटालियन, ‘गर्ल्स प्लाटून कमांडर ऑफ ऑल इंडिया गार्ड’ ‘ऑफ ऑनर ऑफ गर्ल्स ट्रूप’ या पदावर रायफलधारक गटाचे ती नेतृत्व करणार आहे. या गटासाठी महाराष्ट्रातून दहा कॅडेटची निवड झाली असून त्यात ७ मुले, ३ मुली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी देण्यासाठी रायफल गटात पुण्यातून प्रणिता हिची एकमेव निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही गौरवाची बाब आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचे कर्नल व्ही.के.मल, ग्रुप कमांडर अर्जुन मित्रा यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तसेच महा‌विद्यालय प्राध्यापिका प्रतिभा राव, प्रा.रेश्मा पाटील यांचेही सहकार्य मिळाले.

दिल्लीतील कर्तव्यपथावर जाण्यासाठी मला संधी मिळणे, ही कुटुंबीय व माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. खूप कठीण सराव आणि मेहनतीनंतर स्वप्न पूर्ण झाले आहे
- प्रणिता मोरे, सिनिअर अंडर ऑफिसर, राष्ट्रीय छात्र सेना
WKD24A05525

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com