सौरउर्जा प्रकल्प साकारत आदर्श; पर्यावरणासही चालना

सौरउर्जा प्रकल्प साकारत आदर्श; पर्यावरणासही चालना

बेलाजी पात्रे
वाकड, ता. ११ : आर्थिक बचत आणि सदस्यांच्या सहकार्याने सुमारे ५९ लाख रुपये खर्चून प्रकल्प ८६.११ किलो वॅटचा सौरउर्जा निर्मिती प्रकल्प रावेत येथील सिल्वर पाम ग्रोव्ह सोसायटीमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेचा रावेत परिसरातील हा पहिलाच प्रकल्प आहे असल्याने परिसरातून कौतुक होतं आहे. पर्यावरण संवर्धनालाही सोसायटीकडून चालना दिली जात आहे.
चहूबाजूंनी मोठी हिरवीगर्द झाडी, मनाला सुखावणारी प्रसन्नता, शांतता आणि शीतलता सिल्वर पाम ग्रोव्ह सोसायटीला लाभली आहे. याशिवाय, एकीकडे गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुर्गादेवी टेकडी तर दुसरीकडे औंध-किवळे बीआरटी मार्ग, हाकेच्या अंतरावरील मुंबई-बंगळरू महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, सुमारे सात किलोमीटरवरील मेट्रो मार्ग, नियोजित मेट्रो स्थानक अशी उत्तम कनेक्टिव्हिटी सिल्वर पाम ग्रोव्ह सोसायटीला मिळाली आहे.

पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष
सोसायटीची इमारत १६ मजली असून ५ विंगमध्ये तब्बल ३३३ सदनिका आहेत. त्यामध्ये दीड हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. सोसायटीच्या चहूबाजूने वेगवेगळ्या प्रकारची हिरवीगार झाडे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक इमारतीसमोर कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. सोसायटीला बगीचा आहे. त्यामुळे, अतिशय प्रसन्न वातावरण वाटते.

खेळ आणि व्यायामाची सुविधा
मुलांना खेळण्यासाठी दोन भव्य असे पोडियम आहेत. उत्तम आरोग्य राखण्यासाठी जिम देखील आहेत. त्यात आधुनिक प्रकारच्या साधनांसह सोई-सुविधा, उपकरणे आहेत. याद्वारे सदस्यांना सुदृढ बनण्याची संधी निर्माण करून दिली आहे.

भव्य सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित
सोसायटीने कर्ज न घेता आर्थिक बचत आणि सहकार्यातून ५९ लाख रूपये खर्चाचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारला आहे. महाराष्ट्रदिनी (ता. १) या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी बांधकाम व्यावसायिक बिभीषण गायकवाड, देविदास वंजारी, तज्ञ कन्सल्टंट अमोल शूरपाटणे आणि इतर सर्व समिती सदस्य उपस्थित होते. हा प्रकल्प ८६.११ किलो वॅटचा (रूफटॉप ऑनग्रीड प्लांट) असून, त्यात मोनोक्रिस्टलाइन पॅनेलचा वापर केला आहे. विशेष म्हणजे सबसिडी न घेता प्रकल्प पूर्ण केला आहे. महिन्याकाठी सुमारे दीड लाख रूपयांहून अधिकची वीज बचत होणार आहे.

सर्व जातीधर्मांमध्ये एकोपा
आधुनिक सुख-सुविधा, उत्तम नियोजन, संचालक समितीचे योगदान या सर्वांमुळे सिल्वर पाम ग्रोव्हचा नावलौकीक संपूर्ण परिसरात आहे. त्यामध्ये देशाच्या वेग-वेगळ्या काना-कोपऱ्यातील व्यवसायासाठी आलेल्या विविध जाती-धर्माच्या लोकांचा समावेश आहे.

पाणी बचतीला चालना
सोसायटीतील पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पाणी बचतीसाठी प्रबोधन केले जाते. दोन चाकी व चारचाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारलेले आहे. एसटीपी प्लांट कार्यान्वित केला असून त्याद्वारे पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्याने पाण्याची मोठी बचत होत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम
सोसायटीत गणेश मंदिर असल्याने गणेशोत्सव उत्सव, दहिहंडी, होळी, गणेश जयंती, शिव जयंती आणि इतर सर्व सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. गणेश मंदिरामध्ये प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सर्व सभासद एकत्र येत सामूहिक आरती करतात. प्रसाद वाटप केला जातो. महिला भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ कायम कार्यक्रम राबविण्यावर भर देतात.

सभासदांच्या सुरक्षेला प्राधान्य
सोसायटीत अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आहे. बाहेरील आलेल्या व्यक्तीला सोसायटीमधील सभासदांनी परवानगी दिल्याशिवाय आतमध्ये सोडले जात नाही. अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व इमारतींना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. दोन पाळ्यांमध्ये सोळा सुरक्षारक्षक कार्यरत
आहेत.

नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे आणि आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे हा उ‌द्देश डोळ्यांसमोर ठेऊन सोसाटीमधील सर्व रहिवाश्यांपुढे सौर उर्जा प्रकल्पाची कल्पना मांडली आणि त्यास सर्वांनी मान्यता दिल्यामुळे हा प्रकल्प करू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो.
- राहुल गांगुर्डे, अध्यक्ष, सिल्वर पाम ग्रोव्ह, सोसायटी
WKD24A06158, WKD24A06157, WKD24A06162, WKD24A06161,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com