जांबेतील शिबिरात विद्यार्थ्यांना कमांडो प्रशिक्षण

जांबेतील शिबिरात विद्यार्थ्यांना कमांडो प्रशिक्षण

हिंजवडी, ता. १५ : आयटी परिसरातील शालेय मुला-मुलींसाठी जांबेमध्ये निवासी आणि अनिवासी साहसी कमांडो प्रशिक्षण शिबिर झाले. धनुर्विद्या, नेमबाजी, लाठी-काठी, कराटे, आपत्ती व्यवस्थापन, योगासने, नकाशा वाचन, आत्मसुरक्षा यासारख्या विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
शालेय मुलांना मानसिक, बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे, संकटाच्यावेळी स्वतःच्या संरक्षणासाठी सुसज्ज ठेवणे या हेतूने हिंजवडीतील डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटरने पुढाकार घेत जांबेतील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात या शिबिराचे आयोजन केले. त्यामध्ये ८ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा सहभाग होता.
यावेळी उद्योजक भरत गायकवाड, ऍग्रो आयडॉल कैलास जाधव, साखर कारखान्याचे युनिट लीडर अमोल गायकवाड, संतोष जैद, डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटरच्या खजिनदार माधुरी काकडे, प्राचार्या बिथिका संगमा, सोमनाथ बारगजे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नितीन काकडे, नवनाथ कांबळे, सागर भालेराव, रविराज चखाले, प्रतीक्षा आहेर यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. सुभाष वाणी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जांभूळकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com