नकली सोने खरे असल्याचे भासवून  
फसवणूक करणारी टोळी गजाआड

नकली सोने खरे असल्याचे भासवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

वाकड, ता. २३ : बनावट, नकली सोने खरे असल्याचे भासवून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय राजस्थानी टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राजू राम धनाराम वागरी (वय ३२), सुखाराम बाबूजी वागरी (वय २४), जगदीश कुमार हरीराम वागरी (वय २४), शिवलाल सोनाराम वागरी (वय ४०), विशालकुमार छगनलाल वाघरी (वय २२), मसराराम धनाराम वाघरी (वय ४०), भरतकुमार भीमराव वाघरी (वय ३५, सर्वजण राहणार जालोर जिल्हा, राजस्थान)
असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रोख रक्कम, ५ दुचाकी, ३२ मोबाईल, १३ चांदीची नाणी, १० किलो बनावट दागिने असा ६ लाख ५० हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, बनावट सोने विक्री करणाऱ्या टोळीतील सराईत सहा ते सात आरोपी देहूरोड येथील अमरजाई मंदिराजवळ येणार असल्याची माहिती हवालदार गणेश मालुसरे व अली शेख यांना मिळाली. त्यांनी याबाबत तत्काळ वरिष्ठांना कळवले. युनिट पाचचे पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देहूरोड, तळेगाव दाभाडे, रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com