गरजू सात महिलांच्या जीवनात 
माय-माऊलीमुळे प्रकाश

गरजू सात महिलांच्या जीवनात माय-माऊलीमुळे प्रकाश

वाकड, ता. ४ : सुंदर जीवन अनुभवत जगत असताना मोतीबिंदू विकार जडला. मात्र, आर्थिक कुवत नसल्याने नाइलाजाने अंधकारमय जीवन कंठणाऱ्या ‘त्या’ सात गरजू महिलांच्या दुःखावर माय-माऊली प्रतिष्ठानने हळुवार फुंकर घातली. प्रतिष्ठानकडून त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे जीवन आता प्रकाशमान झाले आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे व विनोदे कुटुंबीयांच्या वतीने कै. गजराबाई निवृत्ती विनोदे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. नेरे येथील साईदत्त हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितीन सूर्यवंशी यांनी शस्रक्रिया केल्या. डॉ. अभिषेक लाड, डॉ. स्वप्नील चौधरी व स्टाफने साहाय्य केले. तत्पूर्वी हरीमुखे म्हणा फेम मुरलीधर पंडित व सूर नवा ध्यास नवा फेम किशोरी मुरके यांच्या सुमधुर हरीभजणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
वारकरी शिक्षण संस्थेतील साधक विद्यार्थ्यांचा गौरव झाला. शंकर महाराज शेवाळे, साध्वी वैष्णवी दीदी, क्रांती शुगरचे चेअरमन ज्ञानेश नवले, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या प्रा. भारती विनोदे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक दिलीप दगडे, भाऊसाहेब पानमंद, सुभाष राक्षे, नरेंद्र ठाकर, अभिजित येळवंडे, मयूर मोडक, काळूराम सोनावणे आदी उपस्थित होते. काळूराम साखरे यांनी सूत्रसंचालन केले. माजी संचालिका कुंदा विनोदे, निखिल विनोदे, प्रसाद विनोदे यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com