हार्ट आॅफ आयटी म्हणून ओळखली जाणारी ‘ब्लू रिज सोसायटी’

हार्ट आॅफ आयटी म्हणून ओळखली जाणारी ‘ब्लू रिज सोसायटी’

Published on

बेलाजी पात्रे
हिंजवडी, ता. ३१ ः आयटी नगरी हिंजवडी-माणच्या मध्यावर वसलेली हार्ट ऑफ आयटी म्हणून टाउनशिपमध्ये गणली जाणारी ब्लू रिज सोसायटी. शांततेला एकमेव पर्याय ठरलेली ब्लू रिज टाउनशिप वास्तव्यासाठी संबंध पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. वर्षाकाठी तब्बल पन्नास लाखांची वीज बचत करणारे सोलर पॅनल, पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स, ऑफिसेस, आयटी कंपन्या या सर्वांचा अंतर्भाव असलेल्या, हजारो एकरावरील या टाऊनशिपमध्ये प्रवेश करताच युरोपियन देशात वावरत असल्याचा भास होतो.

टाउनशिपच्या मध्यभागी युनिट ‘सी’ उभे आहे, एका बाजूला मोठा गोल्फ कोर्स, दुसऱ्या बाजूला जलवाहिनी मुळा नदी सी टॉवर सदस्यांच्या मजबूत एकीचा व त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तेजस्वी आणि यशस्वी विचारांचा अभिमान बाळगत स्तब्ध उभा आहे. येथील आचार-विचार ‘वसुदेव कुटुंबकम’ या संकल्पनेतून प्रेरित आहेत. जिथे रहिवाशांमध्ये कोणत्याही भेदभावाला थारा नसून, एक कुटुंब म्हणून जगण्याला प्राधान्य आहे. ७४० सदनिकांत तीन हजाराहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. २८ ते ३२ मजल्याचे गगनचुंबी सहा टॉवर जणू आकाशाशी स्पर्धा करत आहेत.

इतर सुविधा व प्रकल्प
रेन वोटर हार्वेस्टिंग, डब्लूटीपी व एसटीपी प्लांट, ब्लू रिज पब्लिक स्कूल, भाडे तत्त्वावरील सायकल स्टँड, दीड हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, लहान मुलांना विविध खेळाचे ग्राउंड, क्लब हाऊस, जिम, स्विमिंगपूल, बास्केटबॉल व बॅडमिंटन कोर्ट, स्केटिंग रिंग, तब्बल साडे सात हजार चौरस फुटांचे भव्य क्रिकेट ग्राउंड, विविध झाडा-फुलांनी बहरलेले विस्तृत उद्यान सर्वांनाच आकर्षित करते.

डिजिटल सोसायटीसाठी पुढाकार
येथील सोलार पॅनल दररोज १४०० युनिट वीज निर्माण करते, चोवीस तास सीसीटीव्ही आणि मोबाईल ॲपवर आधारित तीन लेव्हल प्रवेश सुविधा, मेंटेनन्ससाठी डिजिटल पेमेंट सुविधा, बायोमेट्रिक, बूम बरीयर, बेस्ट एंट्री, बायोमेट्रिक सिस्टम, सेक्युरिटी अलार्म्स, फायर कंट्रोल डीवायसेस, इंटर कॉम सिस्टमस, सेन्सर आधारित दिवे विजेची बचत करतात. एआय आधारित वाहन प्रवेश आणि निर्गमन, सहकारी तत्त्वावरील शेतकरी दुकान, अपोलो क्लिनिक, चोवीस तास सज्ज असलेल्या रुग्णवाहिका, अग्निशमन दल कार्यरत आहेत.

कर्मचारी व महिलांच्या कल्याणार्थ योजना
कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी संपूर्ण आरोग्य विमा कवच प्रदान करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पॉश मंच सक्रिय आहे. या कमिटीत चार महिला आणि एक पुरुष सदस्य योगदान देत दक्षतेने कर्तव्य बजावीत आहेत. यावर्षी कामगार दिनानिमित्त ११० कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सक्रिय आहे.

सार्वजनिक व सामाजिक उपक्रम
वर्षभर सर्वधर्मीय सण-उत्सव, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण धुमधडाक्यात साजरे होतात. गणेश चतुर्थी, कृष्ण जन्माष्टमी, छट पूजा, नवरात्री, दुर्गा पूजा, दिवाळी, कोजागरी पौर्णिमा, लोहरी, होळी हे सण मोठ्या आनंदात एकत्रित साजरे होतात. मुळा नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी एप्रिलमध्ये ‘मुळा वाचवा’ मोहीम हाती घेण्यात आली. मुळा नदीकाठी वृक्षारोपण करण्यात आले.

मुलांसाठी सुविधा व छंदाला प्रोत्साहन
फुटबॉल, कराटे क्लासेस, बुद्धिबळ, ध्यान आणि योग, संस्कार, संगीत, भरतनाट्यम, फ्रीस्टाईल वर्ग, स्केटिंग क्लास आदी सुविधांचा लाभ घेऊन मुले आपापल्या छंदांना व खेळाला प्रोत्साहन देतात. डिसेंबरमध्ये वार्षिक क्रीडा दिनानिमित्त तीन आठवडे इनडोअर-आउटडोअर स्पोर्ट्स इव्हेंट्स चालले. विविध स्पर्धा व ॲक्टिव्हिटी चारशे मुले, महिला-पुरुष सहभागी झाले होते. याचा सर्वांनी एकत्र येत मनमुराद आनंद लुटला.


‘‘सोसायटीसाठी आम्ही दरवर्षी एक व्हिजन तयार करतो. पंधरा सदस्यीय व्यवस्थापन समितीसह प्रत्येक उपक्रमात पन्नासपेक्षा जास्त सदस्यांच्या सपोर्ट टीमसह फेडरेटेड मॉडेलमध्ये आम्ही काम करतो.
गेल्या वर्षी फिटनेस संस्कृती, पारदर्शकता, उत्तरदायित्व, रहिवाशांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक संघ तयार करने यावर लक्ष केंद्रित केले होते. यावर्षी, ‘डिजिटल नेतृत्वाखालील रहिवाशांची प्रथम सोसायटी’ करण्याचे ध्येय आहे.’’
- अभिषेक नंदन, सचिव, ब्लू रीज सी युनिट

‘‘आमचे हे एक मोठे कुटुंब आहे. दरवर्षी होणाऱ्या विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमात लहान ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. कार्यक्रमांच्या तयारीसाठी महिला, पुरुष सदस्यांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह असतो. ज्येष्ठांचा आनंदयात्री ग्रुप सक्रिय आहे. कमिटीचे विविध कार्यक्रमांना नेहमी उत्तम सहकार्य मिळते. अशा आनंदमय व उत्साही सोसायटीत घर मिळविण्यासाठी नागरिकांची कायम धडपड सुरू असते.’’
- संजय तावडे , सांस्कृतिक समिती सदस्य

सोसायटी कर्मचारी आणि सदस्यांच्या कल्याणासाठी अविरत उत्तम योगदान देत आहे. कमिटीच्या पुढाकारातून दरवर्षी कामगारदिन साजरा होतो. कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. कोणत्याही संकटात किंवा वैद्यकीय गरजेच्या बाबतीत सदस्यांना आणि रहिवाशांना तत्काळ मदत केली जाते. आमची सोसायटी अतिशय भावनिक व संवेदनशील आहे.
- संतोषकुमारी छाबरा, ज्येष्ठ सदस्या

आम्ही नेहमीच टेक्नॉलॉजी एक्सप्लोअर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यापुढे जाऊन आम्ही २५० किलो वॅटची सोलार सिस्टम उभारून नियमित चौदाशे, महिन्याला सरासरी ३० ते ३५ हजार युनिट्स जनरेट करतो म्हणजेच, वर्षाकाठी तब्बल पन्नास लाखांहून अधिक वीज बचत करत आहोत. इंधन बचतीचे अनेक प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. सोसायटीमध्ये कुठेही वायरिंचा गुंता दिसणार नाही. कधीही वीजपुरवठा खंडित होत नाही याची दक्षता आम्ही घेतली आहे.
- कपिल मुळे, कमिटी सदस्य


हिंजवडी ः जल्लोष-ब्लू रिज युनिट सी ढोल ताशा पथकातील सदस्य.

हिंजवडी ः मुळा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘मुळा वाचवा’ मोहीम हाती घेण्यात आली. मुळा नदीकाठी वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com