सकाळ एक्सपो प्रतिक्रिया
मी राहायला पुण्यात आहे. मात्र, मला पिंपरी-चिंचवडमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे. ‘सकाळ’चा एक्स्पो भरविण्यात आल्याने त्यामुळे मी आवर्जून आलो आहे. माझ्या आवडीप्रमाणे ठिकाण आणि बजेटच्या काही प्रॉपर्टीज पाहता आल्या. ‘सकाळ’मुळे अनेक नामांकित बिल्डर्सचे प्रोजेक्टची माहिती मिळाली.
- प्रशांत तळेले, सिंहगड, पुणे
‘सकाळ’ आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोने एकाच छताखाली योग्य किमतीतील अनेक लहान-मोठे प्रोजेक्ट्सबद्दल कळाले. सर्व माहिती मिळाली. आम्हाला अनेक ऑफर देखील मिळाल्या. त्यामुळे, बजेटनुसार आवडीचे घर घेण्यासाठी प्रत्येक साईटवर जाण्याची किंवा सर्वत्र फिरण्यात फार मेहनत घेण्याची गरज लागली नाही.
- अनिता भोसले, वाकड
आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून घराचा शोध घेत आहे. ‘सकाळ’ नेहमीच आमच्या सारख्या गरजू वाचकांची इच्छापूर्ती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते. एक्स्पोतील सहभागी प्रोजेक्टमधील कार्पेट एरिया अधिक आहे. एमेनिटीज देखील इतर प्रोजेक्टपेक्षा निश्चित जास्त आहेत. त्यामुळे, एक रिच फील आला.
- महेश माने, मोशी
उत्तम नियोजन करून ‘सकाळ’ने घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सुसज्ज हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था असल्याने कोणताही त्रास झाला नाही. एक्स्पोमध्ये सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने बजेटला अनुरूप व आपल्या आवडीला प्राधान्य देत निर्णय घेणे सोपे झाले आहे.
- रणजित गडदे, रावेत
ताथवडे, पुनावळे, वाकड, रावेत, किवळे, मावळ, मुळशी व परिसरातील सर्व नामांकित बांधकाम कंपन्यांचा एक्स्पोमध्ये सहभाग असल्याने पैसा आणि वेळ वाया न घालवता सर्वच पर्याय आम्हाला एकाच ठिकाणी जाणून घेता आले. त्यामुळे, प्रोजेक्टचे एकमेकांसोबत तुलना करता आली. आता निर्णय घेणे सोपे झाले आहे. आम्हाला साईट व्हिजिट करण्याची देखील सुविधा मिळाल्याने प्रत्यक्षात फ्लॅट व प्रोजेक्ट जाऊन बघता आला.
- सुप्रिया यादव, शिक्षिका, वाकड
‘सकाळ’ वर्षातून दोन ते तीन वेळा प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करत असल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबीयांना स्वप्नातील घर घेण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त होते. ‘सकाळ’मुळे घरांचे सर्व पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे, आमची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी ‘सकाळ’ची मोठी मदत होत आहे, असे माझे प्रामाणिक मत असल्याने ‘सकाळ’चे आभार.
- रोहित सिसोदिया, चिंचवड
आम्ही घर घेण्यासाठी बऱ्याच दिवसापासून धडपडतोय. आम्ही अनेक बांधकाम प्रकल्पांना भेटी दिल्या आहेत. मात्र, ‘सकाळ एक्स्पो’मध्ये आम्हाला माहित नसलेल्या अनेक प्रोजेक्टचा सहभाग असल्याने आम्हाला चांगले पर्याय मिळाले. नामवंत, गुणवंत व दर्जेदार बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना सोबत घेऊन ‘सकाळ’ चिंचवड, ताथवडेसह अनेक ठिकाणी प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करते. त्यामुळे, खरोखरच ‘सकाळ’चे आभार.
- चित्रा चव्हाण, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.