सोसायट्यांचा निर्धार, कलाटे यांनाच मतदान 
वाकडमध्ये ‘फ्रेंड्स ऑफ राहुल’तर्फे स्नेह मेळावा ः सोसायटीधारकांशी संवाद

सोसायट्यांचा निर्धार, कलाटे यांनाच मतदान वाकडमध्ये ‘फ्रेंड्स ऑफ राहुल’तर्फे स्नेह मेळावा ः सोसायटीधारकांशी संवाद

Published on

वाकड, ता. १७ : राजकारण हे व्यवसायासाठी आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नसून, ते खऱ्या अर्थाने जनसेवेसाठी वापरण्याचे काम राहुल कलाटे करत आहेत. कोणीही कधीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. त्यांच्या प्रामाणिक राजकीय धडपडीचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे आमच्या भावी पिढीसाठी, चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुल कलाटे यांनाच आम्ही आमदार करणार, असा निर्धार आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी ‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ तर्फे आयोजित स्नेह मेळाव्या दरम्यान केला.
‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ या मंचातर्फे वाकड येथील हॉटेलमध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदार संघातील हजारो सोसायटी धारकांशी एकत्रित संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी सोसायटी धारकांच्या आणि आयटीयन्सच्या भावी आमदाराविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या. मूलभूत नागरी सोयी सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
‘‘चिंचवडच्या विकासासाठी मला एकदा संधी द्या. तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येऊ देणार नाही. चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल,’’ असा विश्वास यावेळी कलाटे यांनी उपस्थितांना दिला. वाकड, पिंपळे सौदागर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे निलख, गुरव पिंपळे, विशालनगर, काळेवाडी, थेरगाव, पुनावळे परिसरातील शेकडो आयटीयन्स आणि सोसायटीधारक स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्रित आले होते.

निळ्या पूररेषेतील घरांचा मुद्दा सोडवणार
निवडणुका आल्या की निळ्या पूररेषेतील घरांना आणि दुकानांना नोटिसा दिल्या जातात. निवडणुकीपुरती आश्वासनं दिली जातात. ही एकप्रकारची दडपशाही आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास निळ्या पूररेषेतील घरांच्या आणि दुकानांच्या पाडकामांना कायमस्वरूपी लेखी स्थगिती देण्यात येईल. तिन्ही नद्यांच्या बाजूने संरक्षण भिंती बांधल्या जाईपर्यंत ‘ब्लू लाईन’वर मनाई हुकूम राहील. तसेच; स्वतःच्या प्लॉटमध्ये अनधिकृत घरे असलेल्या नागरिकांना संरक्षण देण्यासाठी झोपडपट्टी संरक्षण कायद्याप्रमाणे विशेष कायदा करण्यात येईल. निळ्या पूररेषेतील सोसायट्यांच्या विकासाचा आणि पुनर्विकासाचा प्रश्नही कायमचा सोडवू, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.
फोटो ः 07352

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com