रणजित आबा कलाटे फाउंडेशनची एकदिवसीय बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात
वाकड, ता. १९ : लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त रणजित आबा कलाटे फाउंडेशन आणि विश्व विजय चेस ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वाकड येथे एक दिवसीय वयोगट व खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच उत्साहात भरविण्यात आली. भूमकर वस्ती येथे वरील स्पर्धा झाली.
स्पर्धेचे उद्घाटन समाज सेविका ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्या हस्ते झाले. रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे, रणजित कलाटे यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी रणजित कलाटे, दीप्ती गर्ग, मिलिंद नाईक, अक्षय वाघमोडे व विश्व विजय चेस ॲकेडमीचे सहकारी उपस्थित होते. वाकड, पिंपळे-निलख, जगताप डेअरी परिसरातील २५० हून अधिक बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी विविध वयोगटांतील १९ खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला यश प्राप्त केले.
पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे -
सूर्यांश देशमुख, वीर पाटील, राजवीर दिवे, अधिराज सिंह, विनय सारेंगन एस.के, शराव बोडके, ऋषिकेश कुलकर्णी, उज्वल गुप्ता, सुहान पठाण, दक्ष म्हेत्रे, अपूर्व देशमुख, अनुज शाह, शरद पंडित, अनन देधिया, सुहास कामतेकर, आदिती खेडकर, अभेद्य दायमा, कुणाल काटे.
WKD25A08025
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

