

वाकड, ता. ११ : राहुल कलाटे फाउंडेशनच्यावतीने आयोजित पिंपरी-चिंचवड वुमेन्स क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. यावेळी भव्य चषकाचेही अनावरण करण्यात आले. स्पर्धेत तब्बल ५४ महिला संघ सहभागी झाले आहेत.
वाकड येथील माउंट लिटेरा स्कूलच्या मैदानावर हे सर्व सामने पार पडणार आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्पर्धेच्या उद्घाटनाचा योग साधण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राहुल कलाटे, महेश थोरात, मिलिंद सावंत, शीतल देशमुख, सायली लांडगे, गायत्री राठोड, मोना गुप्ता यांच्यासह सर्व संघांच्या कर्णधार, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या पर्वात तब्बल ५४ महिला संघ सहभागी झाले आहेत. चार संघांचा एक गट करण्यात आला असून असे १३ संघ आहेत. प्रत्येक संघाच्या तीन-तीन साखळी सामने होणार आहेत. त्यातील विजेते २६ संघ दुसऱ्या फेरीस पात्र होतील. त्यानंतर उपांत्य पूर्व, उपांत्य आणि अंतिम सामना खेळविला जाणार आहे. सर्व खेळाडूंना आयोजकांच्यावतीने क्रीडा गणवेशाचेही वाटप करण्यात आले आहे. सूरज भरगुडे, मयूर चिंचोरे, अक्षय पाटील, अजय तोडकर यांनी स्पर्धेचे संयोजन केले आहे.
महिला क्रिकेट स्पर्धा ही अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायी ठरत आली आहे. या स्पर्धेचे आयोजन आणि व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. त्यासाठी आयोजकांनी खूप मेहनत घेतली असून स्थानिक खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध झाल्याने बऱ्याच महिला आपल्या खेळाचे स्वप्न जगू शकत आहेत आणि आवड जोपासायला त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळाले आहे.
- सायली लांडगे, कर्णधार, फॉन्टस्टिक १५
आमच्या सोसायटीचा महिला संघ या क्रिकेट लीगमध्ये सामील झाला आहे. व्यस्त जीवनातून खेळण्याचा आनंद घेण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. या खेळामुळे एकी, जिव्हाळा तसेच सांघिक भावना वाढली आहे. अतिशय उत्तम आणि सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. अत्यंत पारदर्शकपणे या स्पर्धा चालू आहेत. खेळाबरोबर स्वतःलाही सदृढ करता येत असल्याचा आनंद होत आहे.
- शीतल गवळी, खेळाडू, अंबर रेडियन्स
WKD25A08207
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.