संत तुकाराम कारखान्यावर निवडणुकीची नामुष्की

संत तुकाराम कारखान्यावर निवडणुकीची नामुष्की
Published on

हिंजवडी, ता. २७ : दोन दिवसांच्या खलबतांनंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीला सोमोरे जाण्याची नामुष्की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर ओढावली आहे. हिंजवडी-ताथवडे गटातील ऊस उत्पादक गटात एक अर्ज कायम राहिल्याने त्या गटासाठी ५ एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
संत तुकाराम कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी खासदार विदुरा नवले यांच्यासह चेतन भुजबळ व दत्तात्रेय जाधव या उमेदवारांचा पॅनेलमध्ये समावेश आहे. त्या गटात बाळू भिंताडे हे चौथे उमेदवार आहेत.
मात्र, या गटाच्या निकालासह उर्वरित ८ गटांतील १८ उमेदवारांच्या बिनविरोध निवडीच्या घोषणेची औपचारिकता आता
निकालाच्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
या प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी माहिती दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विदुरा नवले यांच्या नेतृत्वामध्ये २०२५-२०३० करिता संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी सर्व पक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व नेत्यांनी सर्वस्व पणाला लावूनही त्याचा उपयोग झाला नाही.

संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे अधिकृत व बिनविरोध उमेदवार

-गट २ पौड-पिरंगुट : धैर्यशील ढमाले, यशवंत गायकवाड, दत्तात्रेय उभे,
-गट ३ तळेगाव-वडगाव : बापुसाहेब भेगडे, ज्ञानेश्वर दाभाडे, संदीप काशिद
-गट क्र. ४ सोमाटणे-पवनानगर : छबुराव कडू, भरत लिम्हण, उमेश बोडके
-गट ५ खेड-शिरूर-हवेली : अनिल लोखंडे, विलास कातोरे, अतुल काळजे, धोंडिबा भोंडवे
-महिला राखीव : ज्योती अरगडे, शोभा वाघोले
-अनुसूचित जाती-जमाती: लक्ष्मण भालेराव
-इतर मागासवर्ग : राजेंद्र कुदळे
-विमुक्त जाती-भटक्या जमाती : शिवाजी कोळेकर

हिंजवडी-ताथवडे गटात तीनऐवजी चार अर्ज आल्याने त्या गटाकरिता निवडणूक प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यानुसार चिन्हांचे वाटप झाले असून ५ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.
- मुकुंद पवार, निवडणूक निर्णय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com