श्री म्हातोबा-हनुमान उत्सवाला आजपासून होणार सुरुवात

श्री म्हातोबा-हनुमान उत्सवाला 
आजपासून होणार सुरुवात
Published on

वाकड, ता. ११ : ताथवडेचे ग्रामदैवत श्री म्हातोबा-हनुमान देवाच्या तीन दिवसीय उत्सवाला हनुमान जयंती दिवशी (ता. १२) सुरुवात होत आहे. या तीन दिवसांत उत्सव कमिटीकडून आयोजित करण्यात आलेली सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, भव्य आखाडा ग्रामस्थ व भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
दरम्यान, शनिवारी पहाटे हनुमान जन्मावर कीर्तन, म्हातोबा व हनुमान देवाचा अभिषेक, सायंकाळी पाच वाजता मंदिरापासून देवाची काठी व बगाड गाडा मिरवणूक निघेल. काळाखडक येथील पादुकांचे दर्शन करून मिरवणूक ताथवडे गावठाणातील म्हातोबा देवाच्या मंदिरात येईल. तिथे धार्मिकविधी होताच म्हातोबा मंदिर नरसिंह प्रासादिक भजनी मंडळाची सेवा पार पडेल. रविवारी (ता. १३) रात्री राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. मध्यरात्री एकतारी भजन, पहाटे म्हातोबा देवाचा छबिना निघेल. यात नरसिंह तरुण ढोल-झांज पथकाचा सहभाग असेल. सोमवारी (ता. १४) सायंकाळी कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने उत्सवाची सांगता होईल.
भरघोस बक्षीसांच्या इनामी व निकाली ३० कुस्त्या होतील. शेवटची कुस्ती यात्रेचे खास आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व इराण वर्ल्ड चॅम्पियन सलार हबीब यांच्यात शेवटची लढत होईल. विजेत्या मल्लास म्हातोबा किताब, मानाची चांदीची गदा व रोख ५ लाख ५५ हजार ५५५ इनाम देऊन ग्रामस्थांच्या वतीने गौरविण्यात येणार असल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष अजित पोपट पवार यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com