श्री म्हातोबा उत्सवानिमित्त वाकडमध्ये आजपासून कार्यक्रम

श्री म्हातोबा उत्सवानिमित्त वाकडमध्ये आजपासून कार्यक्रम

Published on

हिंजवडी, ता. १३ : वाकड - हिंजवडीचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या उत्सवास शनिवारपासून (ता. १२) प्रारंभ झाला. त्यानिमित्त ग्रामदैवत श्री म्हातोबा उत्सव समितीच्यावतीने सोमवार (ता.१४) पासून दोन्हीही गावांत धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त म्हातोबा गडावरील व वाकड गावठाणातील मंदिरावर आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. हिंजवडीत सोमवारी (ता. १४) रात्री साडेसात वाजता श्री म्हातोबा क्रीडा संकुल येथील भव्य प्रांगणात नमिता पाटील, माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (ता. १५) रात्री ७ वाजता श्री म्हातोबा क्रीडा संकुल येथे गौतमी पाटील यांचा बहारदार संगीत नृत्याचा कार्यक्रम, बुधवारी (ता. १६) मारुती मंदिरात संगीत भजनाचा कार्यक्रम आणि श्री म्हातोबा क्रीडा संकुलात कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडेल, अशी माहिती उत्सव समितीने दिली.

WKD25A08460

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com