पर्यावरण संवर्धनासाठी सदैव अग्रेसर

पर्यावरण संवर्धनासाठी सदैव अग्रेसर
Published on

आमची सोसायटी, आमचा उपक्रम
ला मेलोसा सोसायटी, वाकड


बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. २४ : विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत व पर्यावरण संवर्धनासाठी भरीव योगदान देत वाकडच्या ला मेलोसा सोसायटीने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. ही सोसायटी केवळ इमारतींचा समूह नाही; तर एक घट्ट वीण असलेले कुटुंब आहे. सोसायटीला अधिक सुरक्षित, आनंदी, समृद्ध बनवण्यासाठी व्यवस्थापन आणि कार्यक्रम समिती प्रयत्नशील असते. या सोसायटीची सुरक्षा आणि एकतेची भावना चिरस्थायी ठेवण्यासाठी सोसायटीचे सर्व पर्यावरण स्नेही सदस्य सदैव जागरूक असतात.
नयनरम्य परिसर, अत्याधुनिक सोयी-सुविधांचा आणि रक्ताच्या नव्हे तर माणुसकीच्या घट्ट नाते संबंधांनी गुंफलेले सोसायटीतील सदस्य. हीच सोसायटीची खरी शक्ती आहे ! सदस्यांमधील अभेद्य एकतेची भावना इतरांनाही प्रेरणा देणारी आहे. सोसायटीच्या कल्याणासाठी जसबीर सिंग, संतोष पवार, कुणाल जैन, चेतन भदाणे, श्रीकांत खटिंग, दत्ता घोडेकर, नीरज देशमुख, हेमंत शिरसाट, रोहन डांगे, रवींद्र घाटगे आदी सोसायटी समितीचे पदाधिकारी सर्व सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहेत. कोणीही हाक दिल्यास सर्व त्वरित एकजुटीने पुढे येतात.
सोसायटीने महाराष्ट्र दिनी ७६ किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाद्वारे महिन्याकाठी ९ हजार युनिट्स वीज निर्माण होणार असून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होण्याबरोबर असंख्य झाडांच्या कत्तली वाचविण्यात अनमोल योगदान देत सोसायटीने इतर सोसायट्यांपुढे एक आदर्श उभा केला आहे. सोसायटीत स्वातंत्र्य दिन, शिवजयंती, होळी, धूलिवंदन, प्रजासत्ताक दिन, गणेशोत्सव, रामनवमी, नवरात्री, कोजागरी, ख्रिसमस, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे विविध सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातात.

पर्यावरणपूरक प्रकल्प
सौर ऊर्जा प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सोसायटीकडून कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करणारा व्यापक प्रकल्प राबवला जात आहे. या व्यतिरिक्त, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित केले आहेत. आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे कठोर पालन निश्चित केले आहे. सोसायटी हरित उपक्रमांमध्ये सक्रियपणे योगदान देत आहे. जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी झाडे आणि सीडबॉल लावले जात आहेत.

आधुनिक सुविधा
उद्यान, क्लब हाऊस, अग्निशामक उपकरणे, भव्य गणेश मंदिर, प्रशस्त जिम,जलतरण तलाव, वाहन व्यवस्थापन प्रणाली, विद्युत बॅकअप प्रणाली, पाणी पातळी सेन्सर आणि निर्देशक, इको फ्रेंडली सीटिंग एरिया, सीसी टीव्हीचे सुरक्षा कवच, आधुनिक व अद्ययावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असून सोसायटीच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात.


विविध सामाजिक उपक्रम
वेगवेगळ्या प्रदर्शनांचे आयोजन, क्रिकेट सामने भरविले जातात. लहान मुलांना चित्रपट दाखविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. उस्फूर्त प्रतिसादात रक्तदान शिबिर होते. राष्ट्रीय आणि सार्वजनिक उत्सव, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, सीडबॉल पेरणी शिबिराचे आयोजन केले जाते.


एका एकात्मिक आणि प्रगतीशील सोसायटीचा भाग असल्याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे एक आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण होते. सोसायटीच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून नियमितपणे रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यात सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
- स्नेहा केदार, रहिवासी, ला मेलोसा सोसायटी, वाकड


पर्यावरण रक्षणासाठी आमच्या सोसायटीने उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्या दिशेने आणखी प्रभावी कार्य करण्यासाठी आम्ही सदैव

तत्पर आहोत. विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा मानस सर्वांचा आहे. सोसायटीच्या कल्याणासाठी आम्ही नेहमीच एकजूट दाखवत असतो.
- सपना पाटील, रहिवासी, ला मेलोसा सोसायटी, वाकड

आमची सोसायटी छोट्या भारताचे प्रतीक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतील लोक आनंदाने राहतात. सर्व सण साजरे केले जातात. आम्ही पिंपरी चिंचवड शहरात आदर्श सोसायटीचा मान मिळवला आहे. सौर उर्जा, एसटीपी प्रकल्प, कचरा वर्गीकरण, पावसाच्या पाण्याचे संकलन अशा अनेक उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन केले जाते.
- सुरेश शहाणे, रहिवासी, ला मेलोसा सोसायटी

सोसायटीमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका वर्षभर आयोजित केली जाते. समर्पित समिती सदस्यांच्या कुशल नेतृत्वाखाली दैनंदिन उपक्रमांचे अचूक नियोजन आणि वेळेनुसार प्रभावी व्यवस्थापन केले जाते. सर्व राष्ट्रीय, पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक भावनेने साजरे होतात.
- विजय डांगे, रहिवासी, ला मेलोसा सोसायटी

WKD25A08694, WKD25A08696, WKD25A08699, WKD25A08695

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com