मारुंजी हद्दीतील रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिगारे

मारुंजी हद्दीतील रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिगारे
Published on

हिंजवडी, ता. ११ : मारुंजी गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचऱ्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे.
याबाबत मारुंजी ग्रामपंचायतीकडे नागरिक वारंवार तक्रारी दाखल करतात. मात्र, त्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. आता पावसाळा सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
लक्ष्मी चौक - मारुंजी रस्त्यावर प्रवेश करताच मारुंजी गावापर्यंत जागोजागी कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्यांचा घाणेरडा प्रत्यय सर्वांना येतो. विब्योर स्कूल ते शिंदे वस्ती व इतर लोकवस्ती असलेल्या अनेक अंतर्गत रस्त्यांवर कायम कचरा पसरलेला असतो. ग्रामपंचायतीने त्वरित ठोस पावले उचलून कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी निश्चित यंत्रणा उभारावी तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, रस्ते स्वच्छ ठेवावेत आणि नागरिकांच्या आरोग्यास हानी होणार नाही, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कचरा संकलनासाठी आमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, रात्री-अपरात्री कामावरून येणारी काहीजण असे चोरून कुठेही उघड्यावर कचरा टाकून जातात. एखाद्या ठिकाणी एक दोन गठ्ठे पडले की बाकीचेही तिथेच कचरा टाकतात. शनिवारी- रविवारी हा कचरा काढून घेतला जाईल.
- तुळशीराम रायकर, ग्रामविकास अधिकारी, मारुंजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com