हिंजवडी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरा कक्षाचे उ‌द्‍घाटन

हिंजवडी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरा कक्षाचे उ‌द्‍घाटन

Published on

हिंजवडी, ता. १० : आयटी पार्क हिंजवडी फेज - १ व माण फेज - २ परिसरात एकूण ३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यांच्या हिंजवडी पोलिस ठाण्यातील नियंत्रण कक्षाचे उद्‍घाटन पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त, सुनील कुराडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, एम्बेसी टेक झोन कंपनीचे रे वर्गीस कल्लेमेली, संदीप तापडिया, वाल्मीक शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते. रवी चौधरी यांनी सीसीटीव्ही प्रकल्पाविषयी व कॅमेरे बसविण्यात आलेल्या ठिकाणाबाबतची माहिती दिली.
एम्बेसी टेक झोन कंपनीच्या सीएसआर निधीमधून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फेज -१,२ आणि ३ परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीस वचक बसणार आहे. कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडल्यास अथवा तो उघडकीस येण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत होईल. गुन्हेगारी कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहील. या दृष्टीकोनामधून उच्च तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

WKD25A09004

Marathi News Esakal
www.esakal.com