काळाखडक परिसराची वेगाने स्वच्छता

काळाखडक परिसराची वेगाने स्वच्छता

Published on

वाकड, ता. १७ : चिंचवड-डांगे चौक-हिंजवडी मार्गात काळाखडक झोपडपट्टीतील अतिक्रमणे महापालिकेने बुधवारी (ता. १६) हटविली. या कारवाईनंतर जमा झालेले बांधकाम साहित्य व राडारोडा उचलण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तर, येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरण सुरू केले जाणार आहे.
प्रशासनाने सहा डंपर, दोन पोकलेन, तीन जेसीबी आणि १२ मजुरांच्या मदतीने ही स्वच्छता सुरू केली आहे. उचलेले साहित्य व राडारोडा रावेत-वाकड गार्डन व मोशी येथील ‘सीएनडी वेस्ट’ येथे टाकण्यात येत आहे. तर, कारवाई झालेल्या भागांतील नागरिकांची येथील भंगार साहित्य, लोखंड गोळा करण्यासाठीची रात्रंदिवस लगबग सुरू आहे. दुसऱ्या बाजूला अवजड वाहनांची वर्दळ, त्यातच स्वच्छतेच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. दरम्यान, परिसर स्वच्छता होताच काळाखडक येथील रस्ता रुंदीकरणाला गती मिळणार आहे. त्यासाठी अडथळेही दूर केले जात आहेत. रुंदीकरण पूर्ण होताच परिसरात सुरक्षित व जलद प्रवास शक्य होईल अशी अपेक्षा आहे.
राडारोडा उचलण्याबरोबरच स्वच्छता आणि अन्य पायाभूत सुविधांचे नियोजन केले जात आहे. नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असले, तरी काहींनी येथील कोंडी आणि गोंधळामुळे होणाऱ्या त्रासाबाबतही नाराजी व्यक्त केली.


काळाखडक परिसरातील राडारोडा हटविणे शुक्रवारी सायंकाळपर्यंत संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर तत्काळ रस्ता रुंदीकरण सुरू केले जाणार आहे. यानंतर वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग

काळाखडक : अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर सुरू असलेली परिसराची स्वच्छता आणि त्यामुळे झालेली वाहनांची कोंडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com