वर्षावास प्रारंभानिमित्त ग्रंथाचे वाचन, प्रवचन
वाकड, ता. १९ : थेरगावमधील गणेश नगरातील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभानिमित्त तीन महिने रोज सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित तथागत भगवान गौतम व त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन तसेच दर रविवारी धम्मचक्र प्रवचन मालिका होत आहे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आषाढी पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत हा उपक्रम चालेल. दर रविवारी प्रसिद्ध वक्ते प्रवचन देतील. प्रवचनांचे विषय व व्याख्याते असे :
आयु. सुलभा कांबळे : बौद्ध धम्मातील आषाढी पौर्णिमेचे महत्त्व, राजाभाऊ भैलुमे : बौद्ध धम्म विलयाची कारणमीमांसा, पंजाबराव वानखेडे : ग्रंथ वाचनाप्रमाणेच धम्म आचरणाचे महत्त्व, एस. एल. वानखेडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती, डॉ. सुलक्षणा शीलवंत-धर : ‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज’, अण्णासाहेब बोदडे : अर्थतज्ज्ञ डॉ. बाबसाहेब आंबेडकर, शरद जाधव : ‘हिंदू कोड बील’, अनिल सूर्यवंशी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान, संस्कृती चांदणे : आदर्श माता रमाई, बापू गायकवाड : बौद्धांची पवित्र स्थळे, पी. आर. सोनवणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान, संजय बेंडे : धम्म आणि विज्ञान, संतोष जोगदंड : आंबेडकरी चळवळीतील सामाजिक व शैक्षणिक क्रांती, मानव कांबळे : वर्षावास सांगता समारोह (आश्विन पौर्णिमा)
-----