गावठाणात २४ तर; गावाबाहेर ३० मीटर रस्ता हवा

गावठाणात २४ तर; गावाबाहेर ३० मीटर रस्ता हवा

Published on

हिंजवडी, ता. ५ : आयटी पार्क उभारण्यासाठी हजारो एकर जमिनी दिल्या. चौथ्या टप्प्यासाठी बाराशे एकर जमिनीवर शिक्के असल्याने वीस वर्षांपासून त्या जमिनींचा काहीही उपयोग करून घेता येत नाही. रिंगरोड व अन्य रस्त्यांसाठीही जमिनी संपादित झाल्या. एवढा त्याग करुनही माण ग्रामस्थांच्या पदरी केवळ अपमान आणि अवहेलनाच आली. आता मात्र, गोळ्या घातल्या तरी चालतील; पण गावच्या अस्मितेला धक्का पोहोचू द्यायचा नाही,’’ अशी ठाम भूमिका माण ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ५) विशेष ग्रामसभेत घेतली.
आयटी पार्क, माण गावठाणातील प्रस्तावित ३६ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या विरोधात ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त मागणीवरून मंगळवारी (ता. ५) माण ग्रामसचिवालयातील शरदचंद्रजी पवार सभागृहात सरपंच अर्चना आढाव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या सभेत ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गावची ओळख पुसू नये म्हणून गावठाणामधून जाणारा रस्ता ३६ ऐवजी २४ मीटर करावा व गावाबाहेरून जाणारा रस्ता ३० मीटर करावा यावर एकमताने ठरावही मंजूर करण्यात आला.
आमचा विकासाला विरोध नाही. रस्त्यांनाही विरोध नाही. मात्र, आमच्याही बाजू ऐकाव्यात, असे म्हणत सुरेश पारखी, मल्हारी बोडके, संतोष मोहिते, विजय राक्षे, संगीता इरले, किरण राक्षे यांनी ३६ मीटर रस्ता का नको ? याबाबत भूमिका मांडली. ग्रामविकास अधिकारी मदन शेलार विषय पत्रिकेचे वाचन केले. सदस्य संदीप साठे यांनी आभार मानले.

आमचीही बाजू समजून घ्या
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची अधिकारी व काही आयटी कर्मचारी दिशाभूल करत असून त्यांना चुकीची माहिती देत आहेत. मुळात वास्तव काही वेगळेच आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आम्हाला वेळ द्यावी. आमची देखील बाजू समजून घ्यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

सध्या सुरू असलेल्या प्रस्तावित रस्त्यांबाबत भूमिका घेण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी लेखी अर्जाद्वारे ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामसभा घेऊन पुढील ध्येय धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे.
- अर्चना आढाव, सरपंच, माण


प्रमुख मागण्या अन् मुद्दे
- आयटीसाठी ग्रामस्थांनी हजारो एकर जमिनी देत योगदान
- बाराशे एकर जमिनीवर २० वर्षांहून अधिक काळ शिक्के
- शिक्क्यांमुळे मालकी हक्काच्या जमिनींचा विकास करणे अशक्य
- कंपन्या येण्यापूर्वीच एमआयडीसीने रस्त्याचे नियोजन का केले नाही ?
- माणदेवी वरुन गावचे नाव; मात्र रुंदीकरणात हे मंदिर जात असल्याने अस्तित्वावरच घाला
- आयटी कंपन्यांसाठी आरक्षित शेकडो एकर जमिनीवर मोठ्या टाऊनशिप उभ्या का केल्या ?
- पावसाचे पाणी वास्तविक साठते कुठे आणि तुम्ही कारवाई केली कुठे ?
- भूसंपादनाबाबत कुठलीही नोटीस अथवा प्रक्रिया न राबविता थेट ताबा
- जबरदस्तीने भूसंपादन केल्यास ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


WKD25A09203

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com