माय रमाईची लेक, समाज गौरव पुरस्काराचे वितरण
वाकड, ता. ७ : माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने ‘माय रमाईची लेक’ व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव २०२५ पुरस्कार सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला. यानिमित्त वधू-वर परिचय मेळावाही भरविण्यात आला.
माता सावित्रीबाई फुले स्मारक हॉलमध्ये वरील कार्यक्रम झाला. भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई, माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे, उपाध्यक्ष मंगल चौरे, गायक साजन बेंद्रे, गायक राहुल शिंदे, सूर्यकांत वाघमारे, सिनेअभिनेत्री डॉ. इशिता सूर्यवंशी, शीतल गायकवाड, ईशा धोंगडे, वैशाली लगाडे, अश्विनी कसबे, अंजली सरोदे, रंजन चोपडे, छाया साळुंखे, भिकनबाई उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजसेविका ज्योती राजिवडे व भरत राजिवडे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या बहुसंख्य वधू-वरांचा परिचय करून देण्यात आला. माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे योजनाबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
WKD25A09208