पिंपरी-चिंचवड
हिंजवडीत ‘एनएसजी’चे ‘मॉक ड्रिल’
हिंजवडी, ता. ६ : आयटी पार्क टप्पा क्रमांक दोन येथील इन्फोसिस कंपनी परिसरात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) कमांडोजनी बुधवारी (ता. ६) व्यापक ‘मॉक ड्रिल’ झाले. सुमारे चार तास हे मॉक ड्रिल चालले.
त्यासाठी तब्बल शंभरहून अधिक जवान व अधिकारी हेलिकॉप्टरद्वारे दुपारी हिंजवडीत दाखल झाले. दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे समन्वय, तत्परता आणि प्रतिसाद क्षमता तपासणे मॉक ड्रिलचा उद्देश होता. हिंजवडी-माण आयटी पार्कमध्ये अनेक बहुराष्ट्रीय आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी हे ‘मॉक ड्रिल’ झाले. त्यामध्ये स्थानिक हिंजवडी पोलिस, एमआयडीसी फायर ब्रिगेड, बीडीडीएस, आरसीपी क्यूआरटी पथक आणि इतर आपत्कालीन सेवा यंत्रणांनीही सहभाग घेतला.
WKD25A09222