हिंजवडीमध्ये जनजीवन विस्कळीत
वाकड : हिंजवडी-वाकड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला. प्रमुख रस्ते, विविध भुयारी मार्गांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. मुंबई - बंगळुर महामार्गावरील सेवा रस्त्यांना जणू नदीचे रूप आले. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन विद्यार्थी, चाकरमानी व आयटी कर्मचाऱ्यांना प्रवासात अडकून पडावे लागले. अडथळे पार करत इच्छितस्थळी पोहोचताना सर्वांचीच दमछाक झाली.
आयटीतील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला. परंतु ज्यांना कार्यालयात जाणे आवश्यक होते. त्यांना पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर पाण्याने भरलेले रस्ते आणि वाहतूक कोंडी यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली.
पावसाने दाणादाण
- हिंजवडी फेज १, २ आणि ३ मधील अनेक रस्त्यांवर पाणी तुंबून वाहनांच्या रांगा
- रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही वाहनचालकांना त्रास
- भूमकर चौक, सूर्या, पुनावळे, ताथवडे भुयारी मार्गांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले
- डांगे चौकातून सर्व दिशांना जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठी कोंडी
- सखल भागांत पाणी साचल्याने रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण
- काही सोसायट्यांच्या तळमजल्यांवर पाणी शिरल्याच्या घटना
- पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत असल्याने पूरसदृश परिस्थिती
- किराणा खरेदी, मुलांना शाळेतून आणणे-नेणे, यासारख्या कामांत अडथळे
- खरीप हंगामातील पिकांना फायदा; परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याचीही भीती
WKD25A09328
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.