मंदिरांच्या प्रतिकृती, आकर्षक सजावटी, विद्युत रोषणाई

मंदिरांच्या प्रतिकृती, आकर्षक सजावटी, विद्युत रोषणाई

Published on

वाकड, ता. ३ : वाकड परिसरात यंदा देखील अनेक प्रमुख मंडळांनी यंदाही देशातील प्रमुख मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत; तर अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीसह मनोरंजनात्मक आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

गणेश महाल
दत्त मंदिर येथील मानाचा पहिला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवनाथ तरुण मंडळाने मंडळाने ५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यावर्षी सुंदर व भव्य गणेश महल देखावा सादर केला आहे. दररोज महिला मंडळाचे भजन, प्रसाद वाटप, विविध विषयांवर व्याख्याने असे कार्यक्रम झाले. विक्रम कलाटे अध्यक्ष आहेत.

तिरुपती बालाजी मंदिर
उत्कर्ष चौकातील श्रीमंत उत्कर्ष मित्र मंडळ ३५ वे वर्ष साजरे करत आहेत. मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. अध्यक्ष श्रीनिवास कलाटे आहेत.

जगन्नाथ रथ
संस्कृती चौक, कस्पटे वस्ती येथील श्री संत ज्ञानेश्वर भजनी मित्र मंडळाने ४६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने विद्युत रोषणाई भव्य आणि आकर्षक जगन्नाथ रथ हा देखावा साकारला आहे. सचिन कस्पटे अध्यक्ष आहेत.

फुलांची सजावट
मानकर चौक, वाकड येथील अजित मित्र मंडळ (नवसाचा गणपती) ४५ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाने यंदा आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई हा देखावा केला आहे. सोमनाथ मानकर अध्यक्ष आहेत.

जय महाकाल दरबार
वाकड गावचा मानाचा महागणपती अशी ख्याती असलेल्या वाकड गावठाणातील सुदर्शन तालीम मित्र मंडळाला यंदा ४२ वर्षे झाली. मंडळाने यावर्षी जय महाकाल दरबार हा देखावा केला आहे. मंडळाला कोणीही अध्यक्ष नाही. सर्वच कार्यकर्ते अध्यक्ष असे समजून गावची यात्रा असो किंवा श्री म्हातोबा देवाचा भंडारा वा इतर सामाजिक कार्य असो सगळे सहभागी होतात.

नयनरम्य विद्युत रोषणाई
विनोदेनगर, वाकड येथील नवयुग मित्र मंडळाने ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई असा देखावा केला आहे. वर्षभर मंडळाचे सामाजिक कार्यात सक्रिय योगदान असते.

पंचमुखीशेष महादेव
कावेरीनगर पोलिस वसाहतीतील कावेरीनगर पोलिस युवक मित्र मंडळाने ‘पंचमुखीशेष महादेव’ हा देखावा साकारला आहे. हे ३२ वे वर्ष आहे. विनायक गायकवाड हे मंडळाचे आधारस्तंभ असून निखिल कदम अध्यक्ष आहेत.

साधी सजावट
वाकडच्या कस्पटे वस्ती येथील छत्रपती चौकातील श्री छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाचे हे ४२ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने साधेपणाने सजावट केली आहे. सचिन कस्पटे अध्यक्ष आहेत.

फुलांची आरास
कस्पटे वस्ती येथील स्टार मित्र मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. मंडळाने यंदा फुलांची आकर्षक आरास केली आहे. कैलास कस्पटे अध्यक्ष आहेत.

आकर्षक सजावट
काळाखडक येथील जय बजरंग ट्रस्टचे यंदाचे ७ वे वर्ष आहे. आकर्षक सजावट केली आहे. झहीर अरब आधारस्तंभ असून श्रवण लष्करे अध्यक्ष आहेत.

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर
सम्राट चौक येथील सम्राट मित्र मंडळाचे हे २५ वे वर्ष आहे. मंडळाने यंदा पंढरपूरच्या मंदिराचा गाभारा आणि पांडुरंगाची भव्य मूर्ती हा देखावा साकारला आहे. कुणाल वाव्हळकर आधारस्तंभ असून अविनाश शिरसाट अध्यक्ष आहेत.

फुलांची सजावट, रोषणाई
वाकडकर वस्ती येथील श्री गणेश युवा मंचने यंदा ४६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने कमळाचे फूल, फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई हा देखावा केला आहे. विशाल वाकडकर आधारस्तंभ असून नंदकुमार वाकडकर अध्यक्ष आहेत.

फुलांची आरास
विनोदेनगर, वाकड येथील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ नववे वर्ष साजरे करत आहे. मंडळाने यंदा फुलांची आरास केली आहे. अभिषेक विनोदे अध्यक्ष आहेत.

बालाजी मंदिर प्रतिकृती
वाघमारे वस्ती येथील विघ्नहर्ता मित्र मंडळाचे १८ वे वर्ष आहे. मंडळाने बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर केला आहे. अक्षय भोसले अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com