महाल, मंदिरांच्या प्रतिकृती, फुलांची आरास
हिंजवडी, ता. ४ : आयटी पार्क हिंजवडी-माण, मारुंजी आणि पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी मंदिरांच्या प्रतिकृती, पौराणिक देखावे, आकर्षक रोषणाई, फुलांच्या आरास इत्यादी देखावे केले आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याला प्राधान्य दिले आहे.
संत दर्शन
हिंजवडी येथील श्री छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने संत दर्शन हा देखावा केला आहे. यंदाचे ४२ वे वर्ष आहे. गणेशोत्सवातील देणग्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजीटल ॲप विकसित केले आहे, अशा प्रकारची सुविधा निर्माण करणारे हिंजवडीतील पहिले मंडळ ठरले आहे. संदीप साखरे अध्यक्ष आहेत. आदर्शनगर येथील आदर्श तरुण मित्र मंडळाचे हे ३२ वे वर्ष आहे. पर्यावरणपूरक व आकर्षक फुलांची सजावट केली आहे. प्रतीक साखरे हे अध्यक्ष तर संदीप साखरे उपाध्यक्ष आहेत.
उज्जैनचे शिवलिंग
हिंजवडीच्या शिवतेजनगर येथील शिवतेज मित्र मंडळाचे हे ३६ वे वर्ष आहे. मंडळाने उज्जैनच्या महाकाल शिवलिंगाची प्रतिकृती उभी केली आहे. दिनेश जांभुळकर मंडळाचे अध्यक्ष आहेत.
फुलांची मनोहरी सजावट
साखरे वस्ती येथील हिंजवडीचा राजा शिवरुद्र मित्र मंडळ ट्रस्टचे १९ वे वर्ष आहे. मंडळाने यंदा १२ फुटी श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून ती भाविकांचे आकर्षक ठरत आहे. फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. अजय साखरे यांच्यासह सर्वच सभासद अध्यक्ष आहेत. हिंजवडी गावठाणातील हनुमान तरुण मित्र मंडळाचे हे ४२ वे वर्ष आहे. मंडळाने यंदा आकर्षक महाल व फुलांची आरास हा देखावा केला असून विसर्जन मिरवणुकीसाठी भव्य बजरंगबलीची मूर्ती केली आहे. गणेश जांभुळकर अध्यक्ष आहेत. हिंजवडी गावठाणातील जय भवानी मित्र मंडळाने ४३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा मंडळाने मनोहारी फुलांची सजावट केली आहे. राम साखरे अध्यक्ष आहेत. पंचरत्न चौकातील पंचरत्न तरुण मित्र मंडळाने ३२ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. मंडळाने यंदा आकर्षक फुलांची आरास केली आहे. आकाश जांभुळकर अध्यक्ष आहेत.
महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती
हिंजवडी-माण रस्त्यावरील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मित्र मंडळाचे हे २७ वे वर्ष आहे. कोल्हापूरची देवी महालक्ष्मी व एलईडी लाईटमधील मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. अनिकेत काकडे अध्यक्ष आहेत.
माण परिसर ः फुलांची सजावट
माण गावठाणातील शिवतेज मित्र मंडळाचे हे २५ वे वर्ष आहे. आकर्षक फुलांची आरास केली आहे. सर्व जाती धर्मातील मुलांनी मिळून स्थापन केलेले हे मंडळ व गावच्या मध्यवर्ती ठिकाणी गावठाणात आहे. सर्वच सदस्य अध्यक्ष आहेत.
माणमधील श्री काळभैरव तरुण मंडळाचे हे ६५ वे वर्षे आहे. कुस्तीगीर विक्रम पारखी यांच्या आकस्मिक निधनामुळे यंदा साध्या पद्धतीने सजावट करून गणेशोत्सव साजरा केला आहे. संजय शिंदे अध्यक्ष आहेत.
माण गावातील सर्वात जुने जय हनुमान मित्र मंडळाचे हे ६० वे वर्ष आहे. मंडळाने फुलांतील मयूराच्या प्रतिकृतीचा देखावा केला आहे. सूरज पारखी अध्यक्ष आहेत.
मारुंजी ः फुलांची सजावट, रोषणाई
मारुंजीच्या सरकार चौक येथील शिव छत्रपती प्रतिष्ठानचे हे २५ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने उभारलेल्या आदियोगी संकल्पनेवर देखावा सकारला आहे. त्यावर विद्युत रोषणाई देखील केली आहे. अक्षय बुचडे अध्यक्ष आहेत. बुचडेनगर येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित कीर्ती क्लासिक सार्वजनिक गणेश मंडळाने फुलांची आरास, विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे हे ९ वे वर्ष आहे. श्रीकांत बुचडे संस्थापक अध्यक्ष आहेत.
शिवतीर्थनगर येथील महाराज चौकातील महाराज मित्र मंडळाने मारुंजी १४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने फुलांची सजावट केली आहे. अक्षय बुचडे अध्यक्ष आहेत.
ताथवडे ः सजावट, मंदिर
झेठुंबानगर, ताथवडे येथील गुरुदत्त मित्र मंडळाने विद्युत रोषणाई व फुलांची आरास केली आहे. संस्थापक प्रवीण पवार असून धनंजय पवार अध्यक्ष आहेत. ताथवडे गावठाणातील नृसिंह चौक येथील सम्राट मित्र मंडळाने स्वप्नपूर्ती गणेश मंदिर साकारले आहे. मंडळाचे ३८ वे वर्ष आहे. राकेश पवार अध्यक्ष आहेत.
पुनावळे ः बाहुबली सेट, मंदिर
पुनावळे गावठाणातील समीर भुजबळ चौक येथील जय गगनगिरी मित्र मंडळाचे हे पंधरावे वर्ष आहे. मंडळाने भव्य बाहुबली सेट उभा केला आहे. शिवम भुजबळ अध्यक्ष आहेत. पुनावळेतील श्रीनाथ मित्र मंडळ ३० वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाने श्री काळभैरवनाथ प्रतिकृती साकारली आहे. अक्षय पांढरे अध्यक्ष आहेत.
पुनावळे, गावठाण येथील श्री संत सावता माळी तरूण मंडळाचे हे ३२ वे वर्ष आहे. आकर्षक रंगीबेरंगी पडद्यांची सजावट केली आहे. वैभव दर्शले अध्यक्ष आहेत.
कोयते चौक येथील रणखांब मित्र मंडळाचे हे २० वे वर्ष आहे. फुलांची आरास केली आहे अनिकेत कोयते अध्यक्ष आहेत.
पांढरे वस्ती येथील पामरोज गणेश मंडळाचे चौथे वर्ष आहे. मंडळाने फुलांचा सभा मंडप हा देखावा साकारला आहे. अविनाश गुंजाळ अध्यक्ष आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.